बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते.
आता राखी सावंत प्रसिद्ध गायक मिका सिंगमुळे चर्चेत आहे.
राखीने 2006 साली मिकाच्या पार्टीत जबरदस्तीने किस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यावर आता तब्बल 17 वर्षांनी निकाल लागला आहे.
राखी सावंतने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मिका सिंगविरुद्धचा एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्यात आले आहे.
गायक मिका सिंगने अभिनेत्री राखी सावंतला त्याच्यासोबत एका वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास भाग पाडले.
तिथेच त्याने कॅमेऱ्यासमोर राखीला जबरदस्ती किस केले होते.
त्यानंतर राखीने 11 जून 2006 रोजी सिंगरविरुद्ध कलम 354 (विनयभंग) आणि 323 (आघात) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पण अखेर 17 वर्षांनंतर राखी सावंतने मिका सिंगला माफ केले आहे.