ट्रोल होऊनही 'सुख म्हणजे नक्की..' ही मालिका Top 10 मध्ये, TRP च्या रेसमध्ये ही सीरियल अव्वल!

जाणून घ्या तुमच्या आवडीची कोणती मालिका टीआरपीनुसार पहिल्या दहामध्ये आहे

स्टार प्रवाहवरच्या 'रंग माझा वेगळा' या सीरियलने 6.8 टीआरपीसह आपला पहिला क्रमांक याही आठवड्यात कायम राखला आहे.

स्टार प्रवाहच्याच 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने नव्या घरासह स्वतंत्र वाटचाल सुरू केली असून, ही सीरियल 6.5 TRP सह दुसऱ्या स्थानी आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' सीरियलने 6.4  TRP सह तिसरा क्रमांक कायम राखला आहे.

चौथ्या नंबरवर आहे स्टार प्रवाहवरचीच 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका. तिला 5.9 TRP मिळाला आहे. 

'ठिपक्यांची रांगोळी' सीरियलला या आठवड्यात 4.8  TRP मिळाला असून, ती मालिका पाचव्या क्रमांकावर आहे.

4.6 TRP सह  'मुलगी झाली हो' ही स्टार प्रवाहवरचीच सीरियल सहाव्या नंबरवर आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' ही झी मराठीची सीरियल या आठवड्यात 4.4 TRP सह सातव्या क्रमांकावर आली आहे. गेल्या आठवड्यात ती 8व्या क्रमांकावर होती.

'स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा' या सीरियलला 4.1 TRP सह 8वा क्रमांक मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ती 10व्या नंबरवर होती.

'सहकुटुंब सहपरिवार' ही सीरियल 3.8 TRP सह नवव्या स्थानावर कायम आहे.

'मन उडू उडू झालं' ही झी मराठीची सीरियल 3.1 TRP सह 10व्या स्थानी आली आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका Top 10 मध्येही नव्हती

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?