अशोक सराफ यांच्या हातातील त्या अंगठीचं रहस्य!

आणखी पाहा...!

मराठी-हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. '

'पांडू हवालदार', अशीही बनवाबनवी', नवरी मिळे नवऱ्याला', एकापेक्षा एक' अशा अनेक सिनेमांमधून त्यांनाही प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. 

अशोक सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देत असतात. 

त्यामुळेच अशोक सराफ इतक्या वर्षांपासून आजतागायत ती अंगठी का आपल्या हातात घालतात? ती अंगठी का खास आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. 

आज आम्ही तुम्हाला या अंगठीबाबतच सांगणार आहोत. एका मुलाखतीत मामांनी या अंगठीचं  रहस्य उघड केलं होतं. 

विजय लव्हेकर नावाचा अशोक सराफांचा एक मित्र होता.तो त्याकाळात एक मेकअप आर्टिस्ट आणि सोनार होता. 

१९७४ मध्ये एकदा तो अशोक सराफांजवळ आला आणि त्याने एक बॉक्स समोर ठेऊन त्यातील कोणतीही एक अंगठी घ्यायला सांगितली. 

अशोक सराफांनी ती अंगठी घेऊन आपल्या हातात घातली त्यावर सुंदर असं नटराजचं चित्र होतं.

 विशेष म्हणजे अंगठी घातल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना 'पांडू हवालदार'ची ऑफर मिळाली होती. 

आणि त्यांनतरही अनेक दमदार ऑफर्स मिळतच होत्या. त्यामुळे मामांना वाटतं ही अंगठीच आपल्यासाठी लकी आहे.