2021 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांसाठी खास ठरले. 

काही कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. 


अभिनेता अंकित मोहनच्या घरी नुकतंच एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी रुची हिने एका गोड मुलाला जन्म दिला.

युट्युबर, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आई बनल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. उर्मिलाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 

मराठी लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका केतकर यांच्या घरी चिमुकल्या पावलांचे ठसे उमटले. 

जोगवा चित्रपट फेम  स्मिता तांबेच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. 

प्रेक्षकांचा लाडका ठरलेला अभिनेता आरोह वेलणकर काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. आरोहची पत्नी अंकिताने गोंडस मुलाला जन्म दिला.

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बाबा झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

सुंदरा मनामध्ये भरली सिरीअर फेम अभिनेता समीर परांजपे यंदा बाबा झाला. त्याची पत्नी अनुजाने गोंडस चिमुकलीला जन्म दिला.

बिग बॉस मराठी सीझन 3 फेम अक्षय त्याची पत्नी  योगिता यांना दोघांना 7  मे रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. 

अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.