कधी काळी दुसऱ्याच्या घरची भांडी घासायच्या सुप्रिया पाठारे!

 मराठी टेलिव्हिनजन, नाटक क्षेत्रात आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे.

विनोदाचं कमाल टायमिंगनं सुप्रिया पाठारेनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 

अभिनय क्षेत्रात काम करत असताना मागे वळून पाहताना लक्षात येत की त्यांचा इथवरचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

फू बाई फू, होणार सून मी ह्या घरची, पुढचं पाऊल सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुप्रिया पाठारे एकेकाळी लोकांच्या घरची भांडी घासायला जायच्या.

सुप्रिया पाठारे यांची लहान बहिण अर्चना नेवरेकर नाटकात काम करायच्या आणि सुप्रिया त्यांच्याबरोबर सोबत म्हणून जायच्या. 

 सुप्रिया पाठारेंना नाचाची आवड होती. अर्चना पालेकर यांच्याकडे त्यांना भरतनाट्यम शिकायचं होतं... 

त्यासाठी मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम करून केलं. या कामाचे त्यांना 100 रुपये मिळायचे. 

त्यातून त्या भरतनाट्यमच्या क्लासची 70 रुपये फि भारायच्या.  उरलेले 30 रुपये त्या आईला द्यायच्या.

आईबरोबर सुप्रिया जवळपास 18 घरात जाऊन भांडी घासायची काम करायच्या.

चार भावंडांमध्ये सुप्रिया सर्वात मोठ्या. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून रस्त्यावर अंडी विकणं, चणे विकणं, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन देणं अशी काम देखील करायच्या.

सुप्रिया पाठारे नक्कल उत्तम करतात.   शाळेत देखील एका बाईंची नक्कल करताना दुसऱ्या बाईंनी पाहिलं आणि त्यांना नाटकांत काम करण्याची संधी दिली.

आजवर सुप्रिया पाठारे यांनी 'फु बाई फु', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीणबाई' सारख्या मालिकांमध्ये काम केलंय, 

त्याचप्रमाणे  'श्रीमंताघरची सून', 'चि. व चि. सौ कां', 'बाळकडू' सारख्या सिनेमा आणि नाटकांत काम केली आहेत.

'या' मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये

Click Here