मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी.

ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते.

महाराष्ट्राचं महावस्त्र साडीतलं एक शाही फोटोशूट शेयर करत सोनालीने नेटक-यांची मनं जिंकली आहेत. 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते.

या खास फोटोशूटमध्ये सोनालीच्या नथीचा नखरासुध्दा पाहायला मिळतोय. 

दागिने आणि नथ  तिच्या तिच्या मोहक रुपामध्ये भर घालत आहेत. 

सोनालीचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून अप्सरा आली..असंच म्हणावं लागेल.

सोनालीचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून अप्सरा आली..असंच म्हणावं लागेल.

सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून प्रेम केलंय, तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. 

काही दिवसांपूर्वी सोनालीचे 'झिम्मा' आणि 'पांडू' नावाचे दोन मराठी चित्रपट रिलीज झालेत.

सोनालीला मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणूनही ओळखले जाते.