Rashmi Patil-नवरी नटली सुपारी फुटाली
काही दिवसांपूर्वी अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम ह्यांनी लग्नगाठ बांधली.
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी पाटील हिने देखील आपल्या आयुष्यातील खऱ्या जोडीदाराची निवड केलेली आहे.
रश्मी पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल आहे.
झी मराठीवरील कारभारी लयभरी या मालिकेत तिने शोना मॅडमची भूमिका साकारली होती.
21 एप्रिल 2023 रोजी पुण्यातील महाराजा रेस्टोरंट मध्ये रश्मी पाटीलने अक्षय सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता.
त्यानंतर आता 21 मे रोजी हे दोघेही विवाहबद्ध अडकले आहेत.
रश्मीने तिच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यापूर्वी रश्मीने मेहेंदी सोहळा साजरा केला त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला.
रश्मी पाटील आणि अक्षयच्या या नवीन प्रवासासाठी चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.
नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!
Heading 3
Click Here