प्रार्थना बेहेरेसाठी खास दिवस, 'नेहा' साजरा करतेय 39वा Birthday

आज मालिका तसंच चित्रपटरसिकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे

प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' अल्पावधित लोकप्रिय झालेल्या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

या मालिकेत ती अभिनेता श्रेयस तळपदेसह स्क्रीन शेयर करतेय.

मालिकेतील 'एक्सप्रेशन क्वीन' परी अर्थात छोटीशी मायरा ही प्रार्थनाची खूपच लाडकी आहे.

आपल्या चाहत्यांसाठी प्रार्थना अनेकदा ट्रेंडी रिल्स शेअर करते..

मालिकेत प्रार्थना आणि श्रेयसची केमेस्ट्री पाहण्याजोगी आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे

'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', या चित्रपटांआधी ती 'पवित्र रिश्ता' या हिंदी सीरिअलमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली

प्रार्थना इन्स्टाग्रामवर तिच्या को-स्टार्ससह देखील अनेक फोटो शेअर करते

सहकलाकार अंकिता लोखंडेच्या लग्नात देखील प्रार्थना बेहरे उपस्थित होती.

'मेरे यार की शादी है' या कॅप्शनसह तिनं लग्नातील व्हिडीओ पोस्ट केला होता..

श्रेयस तळपदेसह प्रार्थना देखील 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी उपस्थित होती.