हृता दुर्गुळेचा प्रियकर कोण आहे माहितीये?

 'फुलपाखरू', 'दुर्वा' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.

नुकतंच तिने आपल्या प्रियकराचा फोटो शेअर केला. 

हृताने प्रियकरोसोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं.

तर हृताच्या प्रियकराचं नाव प्रतिक शाह असे आहे. 

प्रतीक हा दिग्दर्शक असून त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

'बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.

दिग्दर्शकासोबतच प्रतीक उत्तम डान्सरसुद्धा आहे.

हृतासोबतच प्रतीकनेही फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली.

या दोघांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हृता 'मन उडु उडु झालं' या मालिकेत काम करतेय.