हॅंडसम हंकचा 3 दिवस फ्लॅटमध्ये होता मृतदेह

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.

 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मराठीतील विनोद खन्ना आणि हॅंडसम हंक अशी त्यांची ओळख होती. 

तळेगाव आंबी एमआयडीसीतील सोसायटीमधील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. 

मृतदेह 2-3 दिवस घरातच राहिल्याने आत दुर्गंधीही पसरली होती.

रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनीला पोलीसांनी याबाबत माहिती दिली. 

गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. 

लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे. 

रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.