'माझा होशील ना' फेम आशय कुलकर्णीचं शुभमंगल संपन्न!

आणखी पाहा...!

झी मराठीवरील 'माझा होशील ना' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे आशय कुलकर्णी.

या मालिकेत त्याने सुजय हा खलनायक साकारूनही त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

आता सुजय म्हणजे आशय कुलकर्णी लग्नबंधनात अडकला आहे.

त्याच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

सानिया गोडबोले हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली असून या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 या दोघांचे मोठ्या थाटात मेहंदी आणि संगीत आणि लग्न पार पडले आहे.

आशय कुलकर्णीची होणारी बायको सानिया गोडबोले ही एक नृत्यांगना आहे.

हे दोघे बऱ्याच वर्षांपासून एकत्र असून आता अखेर लग्नबंधनात अडकला आहेत.

 या जोडप्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.