'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम प्रियदर्शनी-ओंकार रिलेशनशिपमध्ये ?
आणखी पाहा...!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठीतील सर्वात लोकप्रिय विनोदी शोपैकी एक आहे.
या शोमधील प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सध्या हास्यजत्रेमधील असेच दोन कलाकार आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपूर्वी शोधमधील कलाकार प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत आपल्या एका फोटोमुळे प्रचंड चर्चेत आले होते.
या फोटोमुळे प्रियदर्शनी आणि ओंकार नात्यात असल्याचं म्हटलं जात होतं.
दरम्यान आस्ताद काळेने केलेल्या कमेंटला प्रियदर्शनीने होकारार्थी उत्तर दिल्याने सर्वच यांच्या नात्यावर ठाम झाले होते.
आता अभिनेत्रीने स्वतः याबाबत खुलासा करत सत्य सांगितलं आहे.
प्रियदर्शनीने खुलासा करत आपण फक्त चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे.
आस्तादने केलेल्या मजेशीर कमेंटला आपणही मजेशीर उत्तर दिल्याचं ती म्हणाली. एका फोटोमुळे इतकी चर्चा होईल वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया तिने दिलीय.