हास्यजत्रा फेम अभिनेत्रीची शाहिदच्या 'फर्जी'मध्ये वर्णी!

शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची वेब सीरिज 'फर्जी' ची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

शाहिद कपूरने ‘फर्जी’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल आहे.

फर्जी या वेब सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री झळकली आहे.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने फर्जी मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली आहे.

प्रियदर्शिनीने ‘फर्जी’मध्ये शाहिद कपूरच्या कंपनीच्या रिसेप्शनिस्टची भूमिका केली आहे.

ती सीरिजच्या दोन भागांमध्ये पाहायला मिळाली आहे.

प्रियदर्शिनीला या सिरीजमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

प्रियदर्शिनी लवकरच 'फुलराणी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'फुलराणी' या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे.