रणवीर सिंह कसं काम करतो? सांगतोय गौरव मोरे
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये रणवीर सिंहनं सर्कसच्या टीमबरोबर हजेरी लावली होती.
रणवीरनं सगळ्या कलाकारांचं
कौतुक केलं.
रणवीरबद्दल बोलताना गौरव मोरे म्हणाला,
'मी फार भारावून गेलो. मला रणवीरबरोबर काम करायला मिळालं'.
'रणवीर शोमध्ये येणार आहे हे
कळल्यावर मला खूप आनंद झाला होता'.
'त्यानंतर तो आमच्याबरोबर स्किट करणार
हे कळल्यावर माझ्यातला उत्साह आणखी वाढला'.
'रणवीर सिंह अतिशय उत्कृष्ट अभिनेता
आहे. त्याचा प्रेमळ स्वभाव मला खूप आवडतो'.
'रणवीरला जे स्किट करायचं होतं त्याच्या काही ओळी आम्ही त्याला दिल्या.
त्याने त्या ओळी व्यवस्थित वाचल्या आणि
त्यात काम केलं'.
'तो कार्यक्रमात आला तेव्हा त्याला पाहून आम्ही भारावून गेलो'.
त्यानं माझ्यासह सर्वांचं कौतुक केलं.
'मला रणवीरबद्दल खूप आदर आहे.
मी त्याचा खूप आभारी आहे'.