वनिता आणि सुमितचा हळदीत भन्नाट डान्स; पाहा व्हिडीओ!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह आज लग्नगाठ बांधणार आहे.

मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

वनिता व सुमितच्या लग्नातील हळदी समारंभ पार पडला आहे.

हळदीचा समारंभातील वनिता व सुमितचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे.

वनिता आणि सुमितने हळद समारंभ एन्जॉय केला असून त्यांचा भन्नाट डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

सगळे मिळून मज्जा करताना दिसून येत आहेत.

वनिता व सुमितने हळदीसाठी खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता.

आता या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.