आजकाल बोल्ड सीन्स, किसिंग सीन सर्रासपणे सिनेमात दिसतात. पण 80-90च्या दशकात कलाकारांना हे मोठ्या पडद्यावर करणं फार अवघड होतं.
1988मध्ये आलेल्या दयावान सिनेमात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी हे धाडस केलं होतं.
माधुरीनं तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नाबरोबर रोमान्स केला होता. दोघांचा किसिंग सीन खूप चर्चेत आला होता.
माधुरी आणि विनोद खन्ना यांनी मोठा किसिंग शुट केला होता. या सीननंतर माधुरीला फार खेद वाटला होता.
80च्या दशकात असा इंटिमेट सीन म्हणजे खूप मोठा आणि चर्चेत विषय होता.
ए ग्रेडड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर असे सीन करताना 10 वेळा विचार करत होत्या. पण माधुरीनं बिनधास्त हा सीन करण्यासाठी होकार दिला.
सिनेमातील माधुरी आणि विनोद खन्नाचा किसिंग पाहून प्रेक्षकांनी 'याची काही गरज नव्हती', असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
त्या किसिंग सीनवर माधुरीनं म्हटलं होतं की, "मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आले होते. इंडस्ट्रीत कसं काम करतात हे मला माहिती नव्हतं".
"असा किंसिंग द्यायचा नसतो हे मला माहिती नव्हतं. त्यामुळेच दयावान सिनेमात मी किसिंग सीन देण्यास कोणताही नकार दिला नाही".
"मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला वाटतं की, मी त्या किसिंग सीनला तेव्हा नाही म्हणायला हवं होतं".
"पण तेव्हा कदाचित मी असं नाही म्हणण्यासाठी थोडी घाबरत होते".
"दिग्दर्शकानं मला त्या सिनेमात त्या सीनमध्ये घेण्यासाठी काहीतरी विचार केला असेल असं मला वाटतं होतं".
"त्यामुळे माझ्यामुळे त्यात अडथळा नको म्हणून मी कदाचित तेव्हा नाही म्हणू शकले नसेल", असं माधुरी म्हणाली होती.