कंगनाच्या Lock Upp मध्ये नव्याने एंट्री झालेली Mandana Karimi कोण आहे?

अलीकडेच सुरू झालेला Lock Upp हा कंगना रणौतचा रिअ‍ॅलिटी शो वेगळ्या कन्सेप्टमुळे पॉप्युलर झाला आहे.

आता या शोमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करिमी हिची एंट्री झाली आहे. त्यामुळे हा शो अधिक ग्लॅमरस होणार अशी चर्चा आहे

मूळची इराणी अभिनेत्री असलेल्या मंदाना करिमीने भारतातही काम केलं असून, सोशल मीडियावर तिचं मोठं फॅन फॉलोइंग आहे.

'बिग बॉस 9'मध्येही मंदाना सहभागी झाली होती. त्या शोनंतर ती भारतातच राहिली. 2017मध्ये तिने बिझनेसमन गौरव गुप्ता यांच्याशी लग्न केलं.

त्याच वर्षी मंदानाने पती आणि सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आणि नंतर मागेही घेतली होती. काही काळाने त्यांचा घटस्फोट झाला.

'कोका कोला' फिल्मचे निर्माते महेंद्र धारिवाल यांच्यावर मंदानाने शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.

'रे', 'भाग जॉनी', 'मैं और चार्ल्स', 'क्या कूल हैं हम 3' या फिल्म्समध्ये मंदानाने काम केलं आहे.

2020 साली 'द कॅसिनो' या वेबसीरिजमध्येही मंदाना झळकली होती.

आता 33 वर्षांची मंदाना करिमी आपले स्टायलिश फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

मंदानाचे बिकिनीमधले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?