Lady Gaga: रॉ मीटपासून बनलेला ड्रेस ते भलामोठा ओव्हरकोट, अतरंगी फॅशनची क्वीन आहे ही पॉपस्टार

अमेरिकन साँगरायटर, सिंगर आणि अभिनेत्री लेडी गागा 28 मार्चला आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे.

आपल्या गाण्यांव्यतिरिक्त ती आपल्या बोल्ड आणि अत्यंत चित्रविचित्र फॅशन चॉइससाठी कायम चर्चेत असते.

'मी असे ड्रेसेस घालते. कारण ते मला इन्स्पायर करतात. माझं पूर्ण जीवन म्हणजे आर्ट आणि परफॉर्मन्स आहे,' असं लेडी गागाने इंटरव्ह्यूत सांगितलं होतं.

2010 साली एमटीव्ही म्युझिक व्हिडीओ अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात ती चक्क रॉ बीफ मीटपासून तयार केलेलं आउटफिट परिधान करून रेड कार्पेटवर आली होती.

2010मध्येच ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड सोहळ्याला तिने स्पेश इन्व्हेडर इन्स्पायर्ड आउटफिट कॅरी केला होता. तसंच केस पिवळे केले होते.

2014मध्ये तिने व्हीआयपी रूम क्लबमध्ये स्पायकी अर्थात काटेदार ड्रेस घातला होता. या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

एकदा तर ती बॉडी हगिंग आउटफिटवर फ्लफी ओव्हरकोट घालून रॅम्पवर अवतरली होती.

निऑन गाउनमधला लेडी गागाचा हा लुक खूप पॉप्युलर झाला होता.

रेड आउटफिट आणि मोठ्या आकाराचा हेड गिअर परिधान केलेल्या लेडी गागाने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या नसत्या तरच नवल.

अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा लुकदेखील तिच्या फॅन्सना खूप आवडला होता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?