माधुरी दीक्षितच्या उजळत्या त्वचेचे रहस्य जाणून घ्या

माधुरीच्या म्हणण्यानुसार त्वचा स्वच्छ राहण्यासाठी दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. 

फळे, फळभाज्या आपल्या आहारात घ्या. जंक फूड्स टाळा. 

तणाव असेल तर त्वचेवर परिणाम होतो. 8 तास पूर्ण झोप घ्यावी. 

नियमितपणे व्यायाम करा, जेणे करून तणाव राहणार नाही. 

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि मगच झोपा. 

गुलाब पाण्याने चेहरा टोन करा. माधुरी व्हिटॅमीन-सी सीरम चेहऱ्यासाठी वापरते.

तेलकट त्वचेसाठी वाॅटर बेस्ड किंवा क्रिम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.

माधुरी ओट्स, मध, गुलाब जल, एलोवेरा आणि दुधापासून बनवलेला फेस मास्क लावते. 

काकडीचे तुकडे दुधात घालून 15 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा.