'मी सगळ्यांचा भाई...'; सलमानचं धमक्यांवर उत्तर

अभिनेता सलमान खानला मागचे काही दिवस जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. 

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.

आमच्या भागात सलमान खानने हरण मारल्याचे लॉरेन्स बिश्नोईनं म्हटलं होतं. 

सलमानला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. त्याने माफी नाही मागितली तर मी त्याला उत्तर देईन, असं त्यानं म्हटलंय. 

त्याचप्रमाणे लॉरेन्सनं असंही म्हटलं की, "मी सध्या गुंड नाही पण सलमान खानला मारल्यानंतर गुंड बनेन". 

या धमक्यांच्या प्रकारनंतर मागील अनेक महिन्यांपासून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

अशातच सलमानला पत्रकार परिषदेत, तुम्ही सगळ्यांचे भाईजान आहात मिळणाऱ्या धमक्यांकडे कसं पाहता? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला.

याच उत्तर देत सलमान म्हणाला, "मी सगळ्यांचा भाई नाही. मी काहींचा 'भाई' आहे तर काहींची 'जान' आहे". 

अशाप्रकारे सलमाननं धमकीवर थेट उत्तर देणं टाळलं. 

सलमानचा 'किसीका भाई किसीकी जान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

अनुष्काशी लग्न करण्याआधी या अभिनेत्रींच्या प्रेमात होता विराट कोहली

Click Here