'त्याला पाहिलं अन्...' लग्नातील 'तो' प्रसंग सांगत इमोशनल झाली कियारा!
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे आजकाल सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत.
7 फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.
त्यांच्या लग्नाचे, संगीत आणि हळदी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
नुकतंच कियाराने लग्नाच्या मांडवात तिला काय वाटत होते, याबद्दलचा खुलासा केला.
तुला एक नववधू म्हणून काय वाटत होते? या प्रश्नाला कियाराने उत्तर चर्चेत आहे.
कियारा म्हणाली, 'मी त्याक्षणी फार भावूक झाले होते.'
'पण जेव्हा दरवाजा उघडला आणि मी सिद्धार्थला पाहिले, त्यावेळी मला मनातून अखेर मी लग्न करतेय असं वाटलं.'
ती पुढे म्हणाली 'मी ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करते, त्याच्याशीच माझे लग्न होत आहे. याचा माझ्या मनात आनंद होता'
कियाराने असं म्हणताच सिद्धार्थ मंचावर आला आणि त्याने तिला मिठी मारली.