कियाराची आई दिसते इतकी सुंदर; अशोक कुमारांशी आहे खास कनेक्शन!

 कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

यांच्या लग्नाचे रोज नवनवीन फोटो समोर येत आहेत.

नुकतंच कियारा अडवाणीच्या कुटुंबाचा फोटो समोर आला होता.

या फोटोमध्ये कियाराचं तर कौतुक होतंच आहे पण त्याहीपेक्षा जास्त कियाराच्या आईची चर्चा होतेय.

कियाराचा आईसोबत फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

कियाराच्या आईचं नाव जीनिव्ही अडवाणी असून त्या एक शिक्षिका आहेत.

जीनिव्ही या अभिनेते अशोक कुमार आणि सईद जाफरी यांच्या कुटुंबातील आहेत.

कियाराच्या आईला पाहून चाहते ती अभिनेत्रीची मोठी बहीण दिसते असं म्हणत आहेत.