कियारा अडवाणी येणाऱ्या काळात एका मोठ्या पॅन इंडिया सिनेमात दिसणार आहे.
कियारा मेगास्टार रामचरण सोबत झळकणार आहे.
आज रामचरण त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
त्यानिमित्त कियाराने या सिनेमाचं नाव जाहीर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
RC15 असे तात्पुरते शीर्षक असलेल्या या चित्रपटाला आता गेम चेंजर असे नाव देण्यात आले आहे.
गेम चेंजर हा एक सिनेमा राजकीय-अॅक्शन थ्रिलर आहे.
कियारा आणि रामचरण यांनी याआधीही एका सिनेमात एकत्र काम केलं आहे.
या दोघांना एकत्र पाहायला चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.
हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याविषयी अद्याप माहिती नाही.