केतकीच्या टॅटूमागे 'पवार कनेक्शन'? 

अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त्र वक्तव्यामुळे चर्चेत असते. 

केतकीनं नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ चर्चेत आलाय.

व्हिडीओमध्ये केतकीच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. 

त्याचप्रमाणे तिच्या हातावरील टॅटूनं लक्ष वेधून घेतलंय. टॅटूवर 186/22 असा आकडा आहे. 

या आकड्याचा अर्थ सांगत केतकीनं खुलासा केलाय.

तिनं म्हटलंय, 'हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे'. 

'ते अंक कैदी नंबरचे आहेत'.

'मी कोणालाही माफ करु शकते... 

पण विसरु शकत नाही', असं केतकीनं म्हटलं आहे. 

NCPचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील वादग्रस्त्र पोस्ट प्रकरणात केतकीला तुरूंगात जावं लागलं होतं.