महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा
प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या सिनेमातून नवी अभिनेत्री
मराठी सिनेसृष्टीला
भेटली आहे.
सना शिंदे ही नवी अभिनेत्री
मराठी सिनेसृष्टीला
लाभली आहे.
शाहीर साबळेंच्या आयुष्यात आधारीत सिनेमात सना त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
भानुमती साबळे असं सनाच्या भूमिकेचं नाव आहे.
महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.
महाराष्ट्र शाहीर सिनेमातील 'बहरला हा मधुमास' हे पहिलं गाणं चांगलंच प्रसिद्ध झालंय.
'बहरला हा मधुमास' हे शाहीरी बाजातील प्रेमगीत आहे.
सना शिंदे ही शाहीर साबळेंची पणती असून दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी आहे.
महाराष्ट्र शाहीर सिनेमात सना
तिच्या पणजीची
भूमिका साकारणार आहे.
बहरला हा मधुमास गाण्यातील
तिची हुक स्टेप देखील
व्हायरल झाली आहे.
लाठी-काठी तर कधी तलवार बाजी! येसूबाईंचे व्हिडीओ चर्चेत
Click Here