3 इडियट्स पुन्हा येणार? करीना कपूर म्हणाली...
3 इडियट्स या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये आहे.
या चित्रपटातील आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या.
आता हे तिघं पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसले. त्यांना एकत्र पाहून ‘3 इडियट्स’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार अशा चर्चा रंगल्या.
याबद्दल आता करिनाने एक व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे.
व्हिडिओमध्ये करीना म्हणाली, 'हे तिघे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. मला वाटतंय ते सीक्वलसाठी एकत्र आले आहेत.'
ती पुढे म्हणाली, 'माझ्याशिवाय कसं शक्य आहे? मी बोमनला फोन करून विचारते यांचं नेमकं काय सुरू आहे. मला तरी ही सगळी सीक्वलची तयारी सुरू आहे वाटतंय.'
करीनाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पण हे तिघे सिक्वेलसाठी एकत्र आलेले नसून शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते.