बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
बॉलिवूड असो वा राजकारण कंगना प्रत्येक बाबीवर आपलं स्पष्ट मत व्यक्त करत असते.
कंगना दमदार अभिनेत्री आहेच, तिने आजवर अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
पण आता अभिनय क्षेत्रानंतर कंगनाला राजकारणात काम करायचं.
नुकतंच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात एंट्री घेण्याबद्दल सांगितलं आहे.
कंगना म्हणाली, 'समाजकार्य करण्याची मला आवड आहे. त्यामुळे राजकारणात काम करण्यासाठी मी पात्र आहे की नाही हे लोक ठरवतील.'
ती पुढे म्हणाली, 'मी कायम अभिनय क्षेत्रात काम करत राहणार. पण देशासाठी राजकारणात काम करायला मला नक्कीच आवडेल.'
'त्यामुळे देशाचा विचार करुन, देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल.' असं मत तिने व्यक्त केलं आहे.
तुम्हाला कंगनाला राजकारणात पाहायला आवडेल का?