'न्यासा 3 वेळा चेहऱ्याला...'; काजोलनं सांगितलं लेकीचं सत्य
काजोल आणि अजय देवगण यांची लेक न्यासा देवगण
न्यासानं नुकताच तिचा 19वा बर्थ डे सेलिब्रेट केला.
न्यासाचं फोटोशूट काही दिवसांआधी प्रचंड व्हायरल झालं होतं.
न्यासा जान्हवी कपूरची कॉपी आहे असंही अनेकांनी म्हटलं.
तिचे फोटो पाहून तिनं चेहऱ्याची सर्जरी केल्याचं म्हटलं गेलं.
लेकीच्या सर्जरीच्या चर्चांवर काजोलनं खुलासा केला आहे.
काजोल म्हणाली, 'न्यासा आठवड्यातून 3 वेळा फेस मास्क लावते'.
'तिच्या मैत्रिणींना, मला आणि अजयलाही ती फेस मास्क लावायचा सल्ला देते'.
'न्यासा अजयसारखी फिटनेस फ्रिक आहे. ती जीम करते. योगा करते'.
'न्यासा सकाळी उठून रिकाम्या पोटी 2-3 ग्लास कोमट पाणी पिते'.
'दलिया, फळे आणि उकडलेली अंडी तिला आडतात'.
काजोल म्हणाली, 'दुपारच्या जेवणात तिला भाज्या, शेंगा, कोशिंबीर आणि चपाती आवडते'.
'न्यासा रात्री डाळ चपाती, भाज्या आणि कोशिंबीर खाते', म्हणून ती इतकी फिट आहे असं काजोल म्हणाली.