साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर हे साऊथ सिनेमाच्या समृद्ध इतिहासातील एक सोनेरी नाव आहे.
RRR मुळे जगभरात त्याचा तुफान चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
अभिनेता नेहमीच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
या सुपरस्टारच्या आयुष्यात आधी लग्न आणि नंतर प्रेम झालं होतं.
ज्युनियर एनटीआरने लक्ष्मी प्रणतीशी 5 मे 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती.
रिपोर्ट्सनुसार, तारकच्या भव्य लग्नाचा एकूण बजेट तब्बल 100 कोटी रुपये इतका होता.
यामध्ये केवळ लग्नाच्या मंडपासाठी १८ कोटी खर्च करण्यात आले होते.
अभिनेत्याची पत्नी लक्ष्मीने वरमालामध्ये परिधान केलेली साडी एक कोटी रुपयांची होती.
लग्नानंतर लक्ष्मीने आपली ही साडी दान म्हणून दिली होती.