कारस्थानी 'श्वेता'  साकारणारी 'डान्सिंग क्वीन', वाचा अभिनेत्रीविषयी

नुकताच झालेला कलर्स मराठी अ‍ॅवॉर्ड सोहळा एकदम दिमाखदार झाला. त्यातल्या या डान्सची बरीच चर्चा झाली.

तो धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणारी अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे. त्या सोहळ्यात रेड कार्पेटवरचा तिचा लुकही ग्लॅमरस होता.

पूर्वा सध्या 'कलर्स मराठी'वरच्या 'जीव माझा गुंतला' सीरियलमध्ये श्वेता हे निगेटिव्ह कॅरॅक्टर साकारते आहे.

'झी मराठी'वरच्या 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतल्या जयडीच्या भूमिकेतून पूर्वा घराघरात पोहोचली होती.

पूर्वा शिंदे ही चांगली नृत्यांगना आहे. 'झी युवा'च्या युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये ती सहभागी झाली होती.

पूर्वाच्या या 'आयब्रो डान्स'चाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

2019मध्ये 'फाइट' या  मराठी सिनेमात पूर्वा झळकली होती. त्याआधी 'हॉस्टेल डेज' या सिनेमातही तिने काम केलं होतं.

पूर्वा शिंदे एक मॉडेलही असून, वेगवेगळे ग्लॅमरस आणि बोल्ड लुक्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

पुण्याची असलेली ही अभिनेत्री 'बुलेट राइड'ही अगदी स्वॅगने करते

'मैं पानी पानी हो गयी'वरचं तिचं हे रील फॅन्सना खूप आवडलं होतं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?