इतका बोल्ड ड्रेस सांभाळणं जान्हवीला झालं कठीण!
अभिनेत्री जान्हवी कपूर या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असते.
नुकतीच तिने एका इव्हेंटला हजेरी लावली होती.
यावेळी जान्हवीच्या विचित्र ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली होती.
जान्हवीने बिटर लेमन रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता.
पण तो ड्रेस खूप रिव्हिलिंग होता, त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.
जान्हवीचा ड्रेसिंग सेन्सही वाईट असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
हा ड्रेस जान्हवीला सांभाळता आली नाही. त्यामुळे तो घालायचाच कशाला असं देखील नेटकरी म्हणत आहेत.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नितेश तिवारीच्या 'बावल' चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे.
याशिवाय ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात देखील दिसणार आहे.