रकुल आणि जॅकी भगनानीची लव्हस्टोरी आहे खूपच भन्नाट!
जॅकी भगनानी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्यासोबतच तो निर्मिताही आहे.
25 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथे जन्मलेला जॅकी हा चित्रपट निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे.
जॅकी भगनानी सध्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
दोघेही बी-टाऊनच्या क्युटेस्ट कपल्सपैकी एक आहेत आणि अनेकदा एकत्र दिसतात.
जॅकी आणि रकुलची प्रेमकहाणी खूप रंजक आहे
दोघेही एकमेकांचे शेजारी होते, पण कधीच बोलले नव्हते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले.
त्यानंतर दोघांच्या मैत्रीतील प्रेमात रूपांतर झालं.
जॅकी आणि रकुल यांनी जवळपास तीन-चार महिने एकत्र वेळ घालवला आणि दोघेही एकमेकांना पसंत करू लागले.
आता दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.