हरनाझ संधूने (21) हिने मिस युनिव्हर्स 2021 हा किताब जिंकला आहे.

मिस युनिव्हर्स होणारी हरनाझ तिसरी भारतीय ठरली आहे. 1994 साली सुष्मिता सेन आणि 2000 साली लारा दत्ता यांनी हा किताब मिळवला होता. 

हरनाझने भारताला 21 वर्षांनी हा सन्मान मिळवून दिला आहे.

मिस पॅराग्वे आणि मिस साउथ आफ्रिका या दोघींना हरवून हरनाझने या किताबावर नाव कोरलं.

हरनाझ ही 70वी मिस युनिव्हर्स आहे. 

हरनाझ चंडीगडमधल्या शीख कुटुंबातली आहे. 

इंग्लिश, हिंदी आणि पंजाबी या भाषांवर हरनाझचं प्रभुत्व आहे. 

टीनएजपासूनच ती सौंदर्यस्पर्धा जिंकत आली असून, 2017मध्ये ती मिस चंडीगड झाली होती. 

मिस इंडिया स्पर्धेत टॉप 12 सौंदर्यवतींमध्ये ती होती. 

मिस दिवा 2021 हा किताबही तिने जिंकला आहे.

तिने काही पंजाबी सिनेमांमध्येही काम केलं आहे.