तब्बल 19 वर्षांपूर्वी मराठमोळा स्पर्धक अभिजीत सावंत 'इंडियन आयडॉल' च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला.
'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीजनचा विजेता बनून अभिजीत सावंत रातोरात स्टार बनला होता.
पण त्याचं स्टारडम फार काळ टिकू शकलं नाही आणि तो इंडस्ट्रीतून गायब झाला.
अभिजीत रस्त्यावर मारहाण झालेल्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. पण त्यानंतर तो पुन्हा गायब झाला.
अभिजीत सावंतचा पहिला ऍल्बम 'आप का अभिजीत' 2005 साली आला होता.
यामध्ये 'मोहब्बतें लुटाऊंगा ' आणि 'लफ्जों में कह ना सकू' ही गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती.
2005 मध्ये अभिजीतने 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण केलं होतं.
अनेक रिऍलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर, अभिजीतने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं.
सध्या अभिजीत विविध स्टेज शो आणि कॉन्सर्ट करत असतो. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.