'दीपू'ने हृषीकेश गाठल्यानंतर तिला मिस करतोय 'इंद्रा', अभिनेत्रीचे Photos Viral

'मन उड उडू झालं'मधल्या दिपूच्या भूमिकेने अभिनेत्री हृता दुर्गुळेने फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

सीरियलसोबतच नाटकातही भूमिका करणारी हृता सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असते.

नुकत्याच झालेल्या वीकेंडला हृता बऱ्याच काळानंतर फिरायला गेली होती.

हृता डेहराडूनमध्ये हृषीकेशला गेली असून, तिथले काही फोटो-व्हिडीओज तिने शेअर केले आहेत.

हृताच्या 'हृषीकेश डायरीज'मधल्या Happy Sunday चा हा रिलॅक्स लुक...

तिथल्या Beatles Cafe मध्ये तिने तिच्या आवडीच्या Vagan Pizza चा आस्वाद घेतला.

हृषीकेशमधला तिचा दुसरा दिवस Adventurous होता. तिथे River Rafting चा आनंदही घेतला.

दरम्यान, हृता तिकडे असताना 'मन उडू उडू झालं'मधला इंद्रा अर्थात तिचा Co-Star अजिंक्य राऊत तिला मिस करतोय. त्याने तशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

'मन उडू उडू झालं' ही सीरियल गेल्या आठवड्यात टीआरपीनुसार टॉप 10 सीरियल्समध्ये समाविष्ट झाली आहे.

'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकातही हृता सध्या काम करत असून, अलीकडेच तिने त्यातल्या सहकलाकारांसोबतचं एक रील शेअर केलं होतं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?