हृताची  चित्रपटसृष्टीतील 10 वर्ष; या भूमिका ठरल्या हिट!

हृता दुर्गुळे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे.

हृताने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मराठी मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

आता अनन्या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर देखील दमदार पदार्पण केलं आहे. 

हृताला चित्रपटसृष्टीत 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

तिने दुर्वा मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.

त्यानंतर फुलपाखरू मालिकेतील तिची वैदेही ही भूमिका देखील हिट झाली होती.

नुकतीच मन उडू उडू झालं मालिकेतील तिची दिपू देखील प्रेक्षकांना भावली होती.

आता येणाऱ्या काळात हृता सर्किट या सिनेमात झळकणार आहे.