लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार हृतिक रोशन?

 अभिनेता  हृतिक रोशन त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कायम चर्चेत असतो.

2014 मध्ये हृतिकने पहिल्या पत्नी सुझेन खानपासून घटस्फोट घेतला होता.

त्यानंतर  काहीच दिवसांत त्याच्या नव्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

 हृतिक अभिनेत्री आणि सिंगर सबा अझादला डेट करत आहे.

आता हृतिक रोशन लवकरच दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 मीडिया रिपोर्टनुसार हृतिकने सबाबरोबर दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. .

 मात्र हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मात्र याबद्दल हृतिक किंवा सबा या दोघांकडून मात्र पुष्टी झालेली नाही.