बिग बींच्या सुनेने लग्नात नेसलेल्या सोन्याची साडीची किंमत किती?

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्याला जगभरात पसंत केलं जातं. 

अभिनेत्री सतत आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. 

ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली आहे. 

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते.

या दोघांच्या लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. 

यावेळी ऐश्वर्या रायच्या लग्नातील साडीने तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने आपल्या लग्नात २४ कॅरेट सोन्यापासून बनवलेली साडी परिधान केली होती. 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या साडीची किंमत त्याकाळात तब्बल ७५ लाख रुपये होती.