टायगर श्रॉफचं खरं नाव काय माहितेय का?
बॉलिवूडचा स्टारकिड आणि ऍक्शन मास्टर म्हणून टायगर श्रॉफ ओळखला जातो.
प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा तो मुलगा आहे.
टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
पहिल्या चित्रपटानंतर त्याच्या लुक्सवरून त्याला ट्रोल करण्यात आलं.
पण त्यानंतर टायगरने आपला चेहरा मोहरा बदलत सगळ्यांनाच चकित केलं.
पहिल्या चित्रपटानंतर टायगरच्या लुक्स सोबतच त्याच्या आगळ्या वेगळ्या नावाची देखील खूप चर्चा झाली.
टायगरने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
पण टायगरचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.
अभिनेत्याला घरात टायगर या नावानं हाक मारली जायची म्हणून त्यानं हेच नाव कायम ठेवलं.