मराठी TV इंडस्ट्रीत हे कलाकार घेतात तगडं मानधन, एका एपिसोडसाठी किती मिळते फी?

 आज मराठी TV इंडस्ट्रीत लाखो रुपये मानधन घेणारे कलाकार आहेत. TOI च्या वृत्तानुसार हे कलाकार एका एपिसोडसाठी मोठी रक्कम घेतात

'झी मराठी'च्या 'तू तेव्हा तशी' या नव्या सीरियलमधून अभिनेता स्वप्नील जोशीने 8 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन केलं आहे.

मीडिया अहवालानुसार, या सीरियलच्या एका एपिसोडसाठी स्वप्नील 60 हजार ते 70 हजार रुपये मानधन घेतो.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला गाजलेला अभिनेता श्रेयस तळपदे 'माझी तुझी रेशीमगाठ'मधून पुन्हा टीव्हीवर झळकला आहे.

श्रेयस एका एपिसोडसाठी 40 हजार ते 45 हजार रुपये घेत असल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे.

सचिन खेडेकर हे नाव जसं अभिनयासाठी ओळखलं जातं, तसंच भारदस्त आवाजासाठीही. 'कोण होणार करोडपती' हा शो ते होस्ट करतात.

'कौन बनेगा करोडपती'ची मराठी व्हर्जन असलेल्या या शोच्या एका एपिसोडसाठी सचिन तब्बल 50 लाख रुपये आकारतात.

उमेश कामत हादेखील मराठी मनोरंजनसृष्टीत गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करून लोकप्रिय झालेला कलाकार. 

'हायेस्ट पेड' मराठी अभिनेत्यांमध्ये उमेशचाही समावेश होतो. सीरियल/शो आणि कामाचा कालावधी यांवर त्याची फी अवलंबून असते.

मुक्ता बर्वे ही मराठीतली एक प्रतिभावान अभिनेत्री. 42 वर्षांची ही अभिनेत्री मालिका, रोल अत्यंत काळजीपूर्वक निवडते आणि पेमेंटही तसंच घेते.

'अजूनही बरसात आहे'मध्ये ती उमेश कामतबरोबर झळकली होती. त्यासाठी तिने तगडं मानधन घेतलं होतं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?