योगायोगाने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि तिचे वडील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

ट्विंकल जितकी सुंदर आहे, तितकीच ती बेधडक देखील आहे. 

तिच्या वाढदिवसानिमित्त  ट्विंकलशी संबंधित अशा काही गोष्टी 

ट्विंकल खन्नाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत दोनदा साखरपुडा केला होता.

 अक्षयसोबत पहिल्यांदाच एंगेजमेंट तोडल्यानंतर ट्विंकल खूप अस्वस्थ झाली होती.

अक्षयच्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या, त्यामुळे ट्विंकल आणि अक्षयचे नाते कमकुवत झाले. 

काही काळानंतर त्यांच्या नात्यात पुन्हा बहार येऊ लागली आणि दोघांनी 2001मध्ये लग्न केले.

अक्षयसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकलने अनोखी अट ठेवली होती.

 ट्विंकल तिच्या 'मेला' चित्रपटासाठी खूप उत्सुक होती.

तिने अक्षयला सांगितले की, 'जर हा चित्रपट चालला नाही तरच ती त्याच्याशी लग्न करेल'.

 'मेला' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही आणि दोघांनी लग्न केले.

ट्विंकल खन्नाला सुरुवातीपासूनच इंटिरिअर डेकोरेशनमध्ये रस होता.

 ट्विंकल खन्नाचे मुंबईत ‘द व्हाईट विंडो’ नावाचे लाईफस्टाईल स्टोअर देखील आहे.