अभिषेकने कसं केलेलं ऐश्वर्याला प्रपोज? 

आणखी पाहा...!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. 

अभिषेकच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. 

त्यांच्या चाहत्यांना अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. 

अभिषेक-ऐश्वर्याची पहिली भेट 'ढाई अक्षर प्रेम के' सिनेमाच्या सेटवर झाली होती. 

त्यांनंतर दोघे पुन्हा 'कुछ ना कहो'च्या सेटवर भेटले होते. 

या चित्रपटापासून त्या दोघांमध्ये मैत्री झाली होती. हळूहळू मैत्रीचं रुपांतरण प्रेमात झालं. 

२००७ मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कला गेले होते. 

न्यूयॉर्कच्या आलिशान हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने फिल्मी अंदाजात ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. 

ऐश्वर्यानेसुद्धा अभिषेकला लगेचच होकार दिला होता.