हंसिका मोटवानीच्या हातावर रंगली मेहंदी!
अभिनेत्री हंसिका मोटवानी बिझनेसमन सोहेल खातुरिया सोबत लग्नगाठ बांधणार आहे.
आता तिच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला.
आपल्या मेहंदी सोहळ्यात हंसिका नवऱ्यासोबत फुल्ल एन्जॉय करताना दिसली.
या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हलका मेकअप आणि मेसी हेअर लूकमध्ये हंसिका अतिशय खुश दिसत होती.
सध्या हंसिकाच्या लग्नसोहळ्यातील आणखी काही झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अलीकडेच हंसिकाच्या कुटुंबीयांनी मुंबईत ‘माता की चौकी’चे आयोजन केले होते.
काही दिवसांपूर्वी सोहेलने आयफल टॉवर समोर हंसिकाला प्रपोझ केले होते.
आता रविवारी ४ डिसेंबरला या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.