शाहरुखच्या जवानमध्ये या मराठी अभिनेत्रीची वर्णी!
                 शाहरुखचा जवान सध्या चांगलाच चर्चेत आहे. 
               हा एक पॅन इंडिया चित्रपट असून यामध्ये शाहरुख सोबत नयनतारा झळकणार आहे. 
                आता यांच्यासोबत या सिनेमात एक मराठमोळी अभिनेत्री देखील दिसणार आहे. 
               गिरीजा ओक जवान मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 
                 गिरिजाने पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 
               गिरिजाचं सध्या चाहते आणि कलाकार अभिनंदन करत आहेत. 
               गिरीजाने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 
               आता गिरीजा या सिनेमात नेमकं कोणत्या भूमिकेत झळकणार हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 
               गिरीजा याआधी 'कला' या हिंदी सिनेमात देखील दिसली होती. 
               पैठणी ड्रेसमध्ये खुललं गिरीजाचं सौंदर्य!
   Heading 3
     Click Here