रितेश देशमुख आणि जिनिलिया हे दोघे सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.
या दोघांच्या लग्नाला तब्बल ११ वर्ष उलटली असली तरी दोघांमधलं प्रेम तिळभरही कमी झालेलं नाही.
बॉलिवूडमधील हे जोडपं महाराष्ट्रात रितेश भाऊ आणि जिनिलिया वाहिनी म्हणून ओळखलं जातं.
आता महाराष्ट्राची सून असलेल्या जिनिलीयाला मराठी संस्कृतीची चांगलीच जाण आहे.
आता आज जिनिलीयाने चक्क नवऱ्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली.
घरीच वडाच्या झाडाच्या फांदीची जिनिलीयाने पूजा केली. या पूजेचा फोटो तिनेचाहत्यांसोबत शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत जिनिलीया म्हणाली, 'वटपौर्णिमा. रितेश देशमुख तू माझ्याबरोबर कायम असशील.'
'लव्ह यु बायको.' असं म्हणत रितेशने देखील जिनिलियावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
रितेश व जिनिलीयाचं एकमेकांवर किती प्रेम पाहून चाहत्यांना हेवा वाटतो.