गौतमी पाटील करणार राजकारणात प्रवेश? म्हणाली... 
                   राज्यात सध्या गौतमी पाटील हे नाव तुफान चर्चेत आहे. (सर्व फोटो क्रेडिट-गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
               या नृत्यांगणेने आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. 
               गौतमी पाटीलच नाव सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. 
               कधी खाजगी आयुष्यामुळे, तर कधी कार्यक्रमांमुळे तर कधी वादविवादांमुळे गौतमी सर्वांच्या निशाण्यावर येत असते. 
               दरम्यान आता  वेगळ्याच कारणामुळे गौतमी पाटील चर्चेत आहे. 
               पुण्यातील खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
               यावेळी गौतमी पाटीलने चक्क राजकारणातील प्रवेशाबाबत आपलं मत मांडलं. 
               ती म्हणाली, 'राजकाणात मला इंटरेस्ट नाही, राजकारणात मी जाणार नाही',
               'मी एक कलाकार आहे, यापुढेही कलाच सादर करणार असल्याचं गौतमी पाटीलने म्हटलं आहे'.