गौतमी पाटील आणि तिचा नाच हा विषय सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे.
गौतमीला अनेक जण विरोध करत आहेत. अशातच अभिनेत्री मेघा घाडगेनं गौतमीच्या अश्लील डान्सची तक्रार अजित पवारांकडे केली होती.
अजित पवारांनी तक्रारीची दखल राष्ट्रवादीच्या मंचावर गौतमीला बोलावू नका अशी सक्त ताकिद दिली.
'गौतमी पाटीलचा डान्स महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. लावणी महाराष्ट्राची परंपरा असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये', असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर गौतमी त्यांची हात जोडून माफी मागितलीये. तिनं म्हटलंय, 'माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा'
'अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. पण अजूनही काही लोक मला ट्रोल करतायेत'.
'माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही?', असा सवालही गौतमीने विचारला.
गौतमी पुढे म्हणाली, 'एवढ्या दिवस मी शांत होते. जाऊदे म्हणत होते. कुणीकाही बोललं तर मी उत्तर देत नव्हते'.
'पण कदाचित माझी वाढती लोकप्रियता त्यांच्या डोळ्यात खुपत असेल. म्हणून माझे काही जुने व्हिडीओ लोक सोशल मीडियावर व्हायरल करतात'.
'मग मला खडसावताना हे ही सांगायला हवं की जुने व्हिडीओ व्हायरल करू नका',असं गौतमी म्हणाली.