सावळा कुंभार अन् गंगीची जोडी पुन्हा रंगभूमीवर!

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि सविता मालपेकर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा  रंगमंच गाजवणार आहेत.

'सुमी आणि आम्ही' नाटकातून दिग्गज कलावंतांची जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार.

 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. 

सुमी आणि आम्ही  या  नाटकातून  ही  जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. 

अभिनेते मोहन जोशी आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा नाटकात साकारणार आहेत.

गाढवाचं लग्ननंतर  जवजवळ १२ वर्षांनी सविता मालपेकर आणि मोहन जोशी एकत्र काम करणार आहेत.

'सुमी आणि आम्ही' हे फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. 

तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री वनिता खरातचा नवरा काय करतो?

Click Here