1994मध्ये आलेला 'हम आपके है कौन'. हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला. सलमान आणि माधुरीची जबरदस्त केमिस्ट्री यात पाहायला मिळाली.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा तर कधीही पाहता येतो. 1995मध्ये सिनेमानं नवा रेकॉर्ड केला होता. आजही काही ठिकाणी सिनेमा दाखवला जातो.
2001मध्ये आलेला 'गदर' या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सनी देओल आणि अमीषा पटेल यात प्रमुख भूमिकेत आहेत.
आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा 'राजा हिंदुस्तानी'. 1996मध्ये आलेला हा सिनेमा देखील ऑल टाइम ब्लॉकबस्टर
सिनेमा ठरला.
2016मध्ये आलेला 'दंगल' सिनेमानं वर्ल्ड वाइट कमाई केली. हा सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही.
1997मध्ये आलेला 'बॉर्डर' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर हंगामा केला होता. हा सिनेमा देखील तुम्ही कधीही पाहू शकता.
काजोल, शाहरूख आणि राणी मुखर्जी यांचा 'कुछ कुछ होता है'. तरूणाचा हा ऑल टाइम फेव्हरेट सिनेमा आहे.
सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चं जगभरात कौतुक झालं. हा सिनेमा देखील ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत आहे.
'3 इडियट्स' हा सिनेमा तर अनेकदा पाहूनही मन भरत नाही. तीन मित्रांची जबरदस्त कहाणी सिनेमात पाहायला मिळते.
2014मध्ये रिलीज झालेला आमिर खानचा 'पीके'. या सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.