गदर साठी ही अभिनेत्री होती पहिली पसंती!

'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचा सिनेमा आहे.
२२ वर्षानंतर हा चित्रपट उद्या  म्हणजेच 9 जून रोजी पुन्हा एकदा रिलीज होणार आहे.
'गदर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटातील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या भूमिका हिट ठरल्या होत्या.
पण  सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
याआधी निर्मात्यांनी या भूमिकेसाठी काजोलचा विचार केला होता.
पण काजोलने नकार दिल्यानंतर ४०० मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या त्यानंतर ही भूमिका अमिषाला मिळाली.
आता या चित्रपटाचा पुढचा भाग 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

लवकरच लग्नबंधनात अडकणार हे सुपरस्टार जोडपं!

Heading 3

Click Here